मेंदू तुमच्या शेणाची पुटं
भरली पण खोला जरा कान
बत्थड्डांनो, लक्ष ठेवा नीमूट
शब्दांचा या राखायाचा मान
काय मक्ख चेहारे घेऊन बसलात
जरा टाळक्यात पाडा प्रकाश
चालतीये राजवसाची मसलत
गाफील राहायचं नाही बस
व्हा तय्यार ही आहे सुवर्ण संधी
अशा शजिते झणझणीत डाळ
नव युग झळाळत येत आहे ढबकत
आणी आमी काय करायच बा
महागुरुचं ऐका
हो वाटतं हे वीकृत, परी व्हाल पुरस्कृत
आम्हाला जेव्हा वाटा मिळेल
अन्यायाचा करू प्रतिकार
व्हा तयार!
जेव्हा ही आम्ही होऊ वरचढ
आणी समंध काही मिळेल फुकट
अर्थात उचलावी लागेल कही जबाबदारी तुम्हाला ही
खिरापतीची होईल खैरात
आम्ही ज्याला पात्र विशेष
पण आमचं जर नाही भरलं ताट
तुम्हाला ही नाही लवलेश
ऐतिहासिक बदलावास व्हा तयार
गलिच्छ घोटाळ्यासाठी सज्ज
काटकोर आखाणी
घट्ट करू बांधणी
दशकाचा नकार
झुगारून अंधार
हे विर ओ सुलतान घेऊ सलाम अन् सन्मान
होऊ आम्ही दैदिप्यमान
महत्वाकांफ्षेला चढली धार
व्हा तयार!