दिस चार झाले मन, पाखरू होऊन
पानपान आर्त आणि झड बावरून
सांजवेळी जेव्हा येई आठव आठव
दूर कुठे मंदिरात होई घंटारव
उभा अंगावर राही काटा सरसरून
नकळत आठवणी जसे विसरले
वाटेवर इथे तसे ठसे उमटले
दूर वेडेपिसे सूर सनईभरून
झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
आता जरी आला इथे ऋतु वसंताचा
ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून